Ad will apear here
Next
तुमच्या खासदारांनी गेल्या पाच वर्षांत काय केले?
या प्रश्नाचे उत्तर देणारी वेबसाइट विकसित; मतदारांना सजग करण्यासाठी पुण्यातील परिवर्तन संस्थेचा उपक्रम
पुणे : मतदान प्रक्रिया हा लोकशाहीचा प्राण असल्याने मतदार सजग असणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच, आपण निवडून दिलेल्या खासदारांनी गेल्या पाच वर्षांत नेमके काय काय केले, याची वस्तुनिष्ठ माहिती मतदारांना मिळण्यासाठी पुण्यातील परिवर्तन या स्वयंसेवी संस्थेने अत्यंत महत्त्वपूर्ण उपक्रम राबविला आहे. देशातील सर्व खासदारांचे ‘रिपोर्ट कार्ड’ या संस्थेने तयार केले असून, ते वेबसाइटवर उपलब्ध करण्यात आले आहे. या वेळचा खासदार निवडताना नागरिकांना त्या माहितीचा चांगला उपयोग होणार आहे. 

खासदारांच्या कामाबद्दलची माहिती लोकसभा, तसेच अन्य सरकारी वेबसाइट्सवर उपलब्ध असते; मात्र त्या आकडेवारीचे विश्लेषण करून नेमक्या, सहज कळेल अशा आणि सहज शोधता येईल, अशा स्वरूपात ती माहिती मांडण्याचे काम ‘परिवर्तन’ टीमने केले आहे. देशातील सर्व खासदारांबद्दलची ही माहिती http://khasdar.info/ या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अधिकृत सरकारी स्रोतांकडून माहिती घेतलेली असल्याने ती निश्चितच विश्वासार्ह आहे.

ही माहिती या वेबसाइटवर मिळेल...
- लोकसभेतील प्रत्येक खासदाराची उपस्थिती किती...
- किती प्रश्न विचारले...
- कायदे, लोकहिताचे प्रश्न यांबद्दलच्या किती चर्चांमध्ये सहभाग घेतला.
- लोकसभेत खासदार या नात्याने स्वतंत्रपणे किती विधेयके मांडली...
- प्रत्येक खासदाराला आपल्या मतदारसंघात स्थानिक पातळीवर विकासकामे करण्यासाठी दर वर्षी पाच कोटी रुपयांपर्यंत निधी वापरता येतो. त्यापैकी किती निधीचा वापर प्रत्येक खासदाराने केला आहे...
- महाराष्ट्राच्या खासदारांनी हा निधी नेमक्या कोणत्या प्रकारच्या कामांसाठी वापरला आहे...
- देशभरात गेल्या पाच वर्षांत कोणत्या प्रकारच्या कामांसाठी किती टक्के निधी वापरला गेला आहे...

पुणे महानगरपालिकेच्या २०१२पासून ही संस्था सातत्याने रिपोर्ट कार्ड हा उपक्रम राबवत आहे. आता देशपातळीवर हा उपक्रम राबविण्यात आला आहे. 

‘गेला सव्वा महिना ‘परिवर्तन’चे कार्यकर्ते आपापले शिक्षण-नोकरी-व्यवसाय सांभाळून या प्रकल्पाच्या कामात झोकून देऊन काम करत होते. हे सर्व कार्यकर्ते स्वयंसेवक असून, कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता निःस्वार्थ भावनेने काम करतात. त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे,’ असे प्रकल्प प्रमुख अंकिता अभ्यंकर यांनी म्हटले आहे. ‘यामध्ये कोणाची बदनामी करणे हा उद्देश नसून, प्रत्येक खासदाराने केलेल्या कामाची माहिती लोकांना मिळावी, हाच हेतू आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 

माहिती संकलन आणि तपासणीच्या कामात सायली दोडके, कल्याणी थिगळे, अमृता नागटिळक, हर्षद महाबळेश्वरकर, सई उपळेकर, अनिकेत राठी, अशोक सुलोचना गणपत, अभिषेक कर्वे, अवनी वेले, हृषीकेश कर्वे, अनिश गोळे यांचा सहभाग होता. दीपक टावरी यांनी वेबसाइट तयार केली. खासदार रिपोर्ट कार्ड अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्यासाठी सोशल मीडियामधून प्रसाराचे काम दीपक बाबर, अनिकेत मुंदडा, अनिकेत राठी आणि अवनी वेले यांनी केले.  

‘या प्रकल्पात सहभागी होण्याविषयीचे आवाहन आम्ही फेसबुकवर केले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन विशाल सूर्यवंशी, सुमित डोळे, तेजस आमडेकर, कैवल्य जोशी, मयूर बागुल, स्वप्नील इंदलकर, निनाद इंदापूरकर, रमेश कपले, निहार थत्ते, आशुतोष बाफना या सर्वांनी माहिती संकलनात यथाशक्ती हातभार लावला,’ असेही अभ्यंकर यांनी वेबसाइटवर म्हटले आहे. 

या वेबसाइटवरील काही महत्त्वाचे मुद्दे : 

- लोकसभेतील चर्चांमध्ये सर्वांत सहभागी होणारे महाराष्ट्रातील खासदार : श्रीरंग बारणे (मावळ)
- सर्वाधिक स्वतंत्र विधेयके मांडणारे महाराष्ट्रातील खासदार : शिवाजीराव आढळराव पाटील (शिरूर)
- सर्वाधिक उपस्थिती असलेले महाराष्ट्रातील खासदार : अरविंद सावंत (दक्षिण मुंबई)
- सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या खासदार : सुप्रिया सुळे (बारामती), ११९२ प्रश्न विचारले
- प्रश्न विचारणाऱ्या टॉप टेन खासदारांपैकी आठ खासदार महाराष्ट्रातील
- डॉ. कलामणि सामल (बिजू जनता दल, ओडिशा), रमेश कौशिक (भाजप, हरियाणा), भैरोप्रसाद मिश्रा (भाजप, उत्तर प्रदेश) या खासदारांची लोकसभेतील उपस्थिती १०० टक्के

प्रत्येक खासदाराबद्दलच्या अशा प्रकारच्या सविस्तर माहितीसाठी खासदार डॉट इन्फो या वेबसाइटला भेट द्यावी आणि पुढच्या वेळचा खासदार निवडताना ही माहिती जरूर लक्षात घ्यावी, असे आवाहन ‘परिवर्तन’तर्फे करण्यात आले आहे. 

(प्रकल्प प्रमुख अंकिता अभ्यंकर यांनी दिलेल्या माहितीचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZZABZ
 Excellent idea . I hope , other states take it up .
Best wishes .
 Read this before deciding whom to vote for . There is no excuse now ,
To say -- I did not know , nobody told me O
Similar Posts
आईच्या दशक्रिया विधीआधी मतदान! पुणे : मतदानाच्या दिवशीच आईचा दशक्रिया विधी असतानादेखील विवेक आणि योगेश सरपोतदार यांनी आपल्या वडिलांसह मतदानाचे कर्तव्य पार पाडले. दशक्रिया विधीसाठी जाण्यापूर्वी त्यांनी आपल्या मतदार केंद्रात हजेरी लावून मतदान केले.
१७व्या लोकसभेत विक्रमी ७८ महिला खासदार नवी दिल्ली : राजकारणात महिलांचा टक्का वाढताना दिसत असून, नुकत्याच झालेल्या १७व्या लोकसभेच्या निवडणुकीत तब्बल ७२४ महिला उमेदवारांनी आपले नशीब आजमावले होते; त्यापैकी ७८ जणींना खासदारपदाची संधी मिळाली आहे. लोकसभेतील महिला खासदारांची ही आतापर्यंतची विक्रमी संख्या आहे. त्यापैकी ४१ महिलांनी या आधीही खासदारपदाची जबाबदारी सांभाळली आहे
‘प्रत्येक खासगी विकसकाने किमान एक एसआरए प्रकल्प हाती घ्यावा’ पुणे : ‘पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सुमारे ४० टक्के लोकसंख्या ही आज झोपडपट्टीमध्ये राहते. हे सारे नागरिक स्वखुशीने झोपडपट्टीत राहत नाहीत. शहराचे सामाजिक स्वास्थ्य सांभाळायचे असेल तर याही नागरिकांना चांगले राहणीमान आणि सुविधा देणे आवश्यक आहे आणि याचसाठी खाजगी विकासकांनी एसआरए प्रकल्पांकडे वळणे गरजेचे आहे
मावळ मतदारसंघासाठी अशोककुमार सिंग निवडणूक निरीक्षक पुणे : मावळ लोकसभा मतदार संघासाठी अशोककुमार सिंग (भा.प्र.से.) यांची सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक म्हणून, तर डॉ. विजयकुमार चड्डा यांची निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language